Ad will apear here
Next
मराठी शुद्धलेखनाचे पहिले ॲप
पुणे : भाषेची शुद्धता आणि नेमकेपणा हा विचार हळूहळू मागे पडत चाललेला असताना, ज्यांना खरोखरच शुद्ध भाषेत लिहायचे आहे, शब्दांचा वापर समजून-उमजून करायचा आहे, अशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मराठी शुद्धलेखन या विषयात गेली अनेक वर्षे काम करणारे व्याकरणतज्ज्ञ अरुण फडके यांनी शुद्धलेखन या विषयावरील पहिले मोबाइल ॲप सादर केले आहे. ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ असे त्याचे नाव असून, पुण्यातील मॉड्युलर इन्फोटेक या सॉफ्टवेअर कंपनीने ते विकसित केले आहे. 

या ॲपमध्ये तब्बल ११ हजार मराठी शब्दांची माहिती दिली आहे. ऱ्हस्व किंवा दीर्घ; विसर्ग असणे किंवा नसणे; स्र किंवा स्त्र त्याचप्रमाणे लेखनसाम्य असले, तरी अर्थभिन्नता असणे; योग्य पर्यायी लेखन असणे; अशा अनेक प्रकारच्या शब्दांसाठी ह्या ॲपमध्ये तऱ्हेतऱ्हेचे ठळक निर्देश दाखवले आहेत. मूळ रूपाला विकार होताना बदलणारे ऱ्हस्व-दीर्घ दाखवले आहेत.

काही शब्दांमध्ये लागोपाठ येणाऱ्या विशिष्ट व्यंजनांचा उच्चार करताना तो उच्चार शब्दात त्या व्यंजनांचे जणू काही जोडाक्षर असल्याप्रमाणे होणे (सुसकारा, सरदी), शब्दात प्रत्यक्षात नसलेले द्वित्व किंवा नसलेला विसर्ग उच्चारात ऐकायला येणे (काव्य, हत्या, अंधकार, घनश्याम), शब्दात नसलेल्या वर्णाचा उच्चार ऐकायला येणे (संरक्षण, सिंह), शब्दात असलेल्या उकाराचा उच्चारात लोप होणे (सुरुवात, गुरुवार), शब्दात नसलेला औ-कार उच्चारात ऐकायला येणे (लवकर); ह्या सर्व प्रक्रिया अनेक भाषांच्या बाबतीत सहज घडणाऱ्या आहेत. अशा सर्व प्रक्रियांमुळे आणि एकंदरीत भाषाशास्त्रानुसार योग्य आणि अयोग्य शब्दांचे लेखन ह्या ॲपमध्ये दाखवले आहे.

‘कोशात वापरलेल्या संक्षेपांचे आणि खुणांचे अर्थ’ आणि ‘कोश कसा पाहावा’ ह्या दोन गोष्टी वापरकर्त्यांनी नीट पाहून घेतल्या, तर ह्या ॲपचा वापर करणे सहजसुलभ होईल, असे फडके यांनी म्हटले आहे. ‘हवा असलेला शब्द शोधण्यासाठी वर्णमाला किंवा बाराखडी पाठ असणे गरजेचे नाही. वरच्या पट्टीत तुम्ही तुमचा शब्द लिहायला सुरुवात करताच त्यानुसार खाली त्या अनुषंगाने शब्द यायला सुरुवात होईल आणि काही सेकंदांतच तुमचा शब्द योग्य-अयोग्य लेखन, सामान्यरूपे, असल्यास इतर काही टीप, अर्थभेद, स्पष्टीकरण अशा आवश्यक त्या बाबींसह समोर येईल. ॲपने दाखवलेल्या योग्य-अयोग्य लेखनाबद्दल तुम्हांला काही शंका असेल, तर शेजारी ‘स्पष्टीकरण’ ह्या दुव्यावर जाऊन तुम्ही त्या शब्दाच्या योग्य लेखनाचे शास्त्रीय स्पष्टीकरण पाहू शकता. शेकडो शब्दांची अशी स्पष्टीकरणे दिली आहेत,’ असेही ॲपच्या माहितीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

‘मराठी भाषेच्या व्याकरणाबद्दल असलेले सरकारचे नियम आणि प्रचलित व्याकरण यानुसार या ॲपमधील शब्द दिले आहेत आणि ते युनिकोडवर आधारित आहे,’ असे अरुण फडके यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ला सांगितले. व्याकरण शिकू इच्छिणाऱ्यांना फडके यांनी लिहिलेल्या ‘मराठी लेखन कोश,’ ‘शुद्धलेखन मार्गप्रदीप,’ ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ अशा पुस्तकांचा उपयोग आतापर्यंत होत होता. आता मात्र बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा उपयोग करून मराठी शुद्धलेखनाचे ॲप विकसित झाल्याने भाषा शिकू इच्छिणाऱ्यांना आणि अचूक लिहू इच्छिणाऱ्यांना खूप मदत होणार आहे.

हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, त्याची किंमत १०० रुपये आहे. अर्थात, ते सशुल्क असले, तरीही मराठी भाषेच्या शुद्धतेच्या दृष्टीने ही किंमत फार मोठी नाही. एक हजार शब्द असलेले निःशुल्क अॅपही प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

सशुल्क अॅपसाठी येथे क्लिक करा.

निःशुल्क अॅपसाठी येथे क्लिक करा.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZHCBD
 आभार आणि धन्यवाद!1
 The much awaited app for every marathi people needed.....
Very best luck for this great app...
 अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. हार्दिक शुभेच्छा1
 मराठी शुद्धलेखनाचे नवे एप फक्त १०० रुपयात. !1
 मराठीत स्पेल चेकर म्हणून ही सोय करून घ्यायला विनंती करतो.
 मराठी भाषाप्रेमींसाठी ही खूपच आनंदाची बातमी आहे. सरांना धन्यवाद!
 'शुद्धलेखन ठेवा खिशात' ह्या अॅपला आपण प्रसिद्धी दिलीत त्याबद्दल धन्यवाद
 It is very good thanks a lot for this app2
 आनंदाची गोष्ट आहे .
 जय महाराष्ट्र1
 It is a good idea and a right time because our matathi language now mix other languages.1
 When would it be available on Apple app store?1
 खुप उपयोगी2
 ही अत्यंत अत्यावश्यक गोष्ट आहे भाषेच्या शुद्धीसाठी
 वा,वा,फारच सुंदर आणि मोठे काम झाले हे.
खूप जरुरी होते ,आमचा लिहिताना होणार गोंधळ खूप कमी होईल.धन्यवाद.3
 खुप.उपयोगी1
 for Desktop
 अति उत्तम, अतिशय उपयोगी, अभिनव शुद्धलेखन माझ्या खिशात हे छोटेखानी पुस्तक वापरतो.
अॅप डाऊनलोड कसे करता येई. किंमत किता? कशी पाठवायची?. नागपुरात हवे आहे.
वसंत गणेश काणे, एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
9422804430
 Shudhalekhan paragraph
Similar Posts
बालदिनी विशेष मुलांसाठी काँग्रेसतर्फे खास कार्यक्रम पुणे : पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती अर्थात बालदिनानिमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटीने कामायनी संस्थेतील मूकबधिर व मतिमंद मुलांसोबत विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. जंगली महाराज रोडवरील मॅकडोनाल्ड येथे १४ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. टॅटू पेंटिंगसह अन्य वेगवेगळ्या गमतीजमतींचा
दाते आणि गरजूंना जोडणारा ई-सेतू आपल्या समाजात वस्तू दान करू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर विविध वस्तूंची गरज असलेल्यांचीही संख्या लक्षणीय आहे; पण या दोन्ही घटकांना एकमेकांबद्दल नेमकी माहिती नसते. दात्यांना गरजूंपर्यंत आणि गरजूंना दात्यांपर्यंत नेमकेपणाने पोहोचवणारा ई-सेतू ‘डोनेट एड सोसायटी’ या संस्थेच्या वेबसाइटच्या माध्यमातून नितीन घोडके या तरुणाने बांधला
अर्भकाला जीवनदान देणाऱ्या कचरावेचक महिलांचा सत्कार पुणे : विश्रांतवाडीतील एकतानगरमध्ये कचराकुंडीत टाकलेल्या नवजात मुलीला जीवदान देणाऱ्या लक्ष्मी राजू डेबरे आणि मंगल जाधव या कचरावेचक महिलांचा पुणे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी स्वच्छ संस्थेच्या व येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ पुणे : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेचा तीन विरुद्ध दोन गुणांनी पराभव करून अमनोरा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेत असलेल्या या दोन्ही मल्लांनी असंख्य कुस्तीशौकिनांना थरारक अनुभव दिला. या लढतीत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language